तेरणा काठ वृत्तसेवा -- येरमाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची नव्याने निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी माजीद चांद शेख तर उपाध्यक्षपदी प्रिती योगीराज माढेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. समितीच्या सदस्यपदी बापू बारकुल, विकास कांबळे,नरहरी बारकुल , मदन बारकुल, संदीप देशमुख, रोहिणी बारकुल, ज्योती मोरे, साधना बारकुल, रोहिणी कोकाटे, प्रतिज्ञा वाघमारे यांची निवड करण्यात आली .यावेळी मुख्याध्यापक सुनंदा जाधव,शिक्षीका मनिषा वाघमारे, भारती देशमुख, जयश्री बेदरे, विलास धावणे,अनिल बारकुल सर, निशिकांत देशमुख,मनोज बारकुल, दत्ता बारकुल, विलास बारकुल, संदीप पंडित यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment
0 Comments