Type Here to Get Search Results !

जेंडर सेन्सेटिव्ह रोल मॉडेल अवॉर्डने संतोष तौर सन्मानित

 


तेरणा काठ वृत्तसेवा --- महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने सन २०२५-२६ साठी देण्यात येणारा ‘जेंडर सेन्सेटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड’ माविम मित्र तथा जनहीत परीवाराचे अध्यक्ष. संतोष बाबासाहेब तौर यांना प्रदान करण्यात आला.

नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत स्वयंसहाय्य महिला बचतगट उत्पादित मालाचे व वस्तुंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सव दि. २७ ते २९ दरम्यान दि उस्मानाबाद क्लब मैदान येथे पार पडले.

या तिन दिवसीय महोत्सवाच्या समारोपावेळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर  यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. समाजात स्त्री-पुरुष समानता, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

संतोष तौर यांनी विविध उपक्रमांद्वारे महिलांना स्वावलंबी बनविणे, बचत गटांना प्रोत्साहन देणे तसेच सामाजिक समतेचा संदेश देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे परिसरात सकारात्मक बदल घडून येत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments