तेरणा काठ वृत्तसेवा – कळंब तालुक्यातील येरमाळा येथील जि प कन्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची नव्याने निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी. प्रवीण (मुन्ना) मोरे यांची तर उपाध्यक्षपदी गोरखनाथ बारकुल यांची एकमताने निवड करण्यात आली.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तसेच शैक्षणिक व भौतिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नव्या समितीकडून सकारात्मक कार्य होईल, असा विश्वास उपस्थित पालकांनी व्यक्त केला.यासोबतच समितीच्या सदस्यपदी विकी बाळासाहेब वाघमारे,भरत नवनाथ उघडे,किरण शिवाजी पवार,सतीश हनुमंत पोळ,ज्ञानेश्वर महारुद्र तोडकरी,अशोक महादेव साळुंखे,बालाजी शांत देशमुख,शिल्पा लालासाहेब देशमुख,प्रियंका उमेश भालेकर,प्रज्ञा सुधीर जाधव,सिंधू अर्जुन उकिरडे ,दूर्वा बालाजी बारकुल, तसेच चेचे कांचन सुधाकर यांची सचिवपदी निवड करण्यात आली
शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक दर्जा व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. नव्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments