तेरणा काठ वृत्तसेवा – महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. 1’ अंतर्गत नागरिकांना विविध प्रशासकीय, जमीन व शैक्षणिक सेवा सुलभ करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नागरिकांना आवश्यक सेवा एका दिवसात उपलब्ध करून दिल्या जातील. यामुळे शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना प्रशासनाकडून त्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या जातील.
तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे:
केशोगाव – ०७/०३/२०२६
बेंबळी – १२/०३/२०२६
तेर – १४/०३/२०२६
करजखेडा – १७/०३/२०२६
ढोकी – १८/०३/२०२६
येडशी – २५/०३/२०२६
आंबेजवळगाव – ०८/०४/२०२६
जागजी – १०/०४/२०२६
पाडोळी – १७/०४/२०२६
धाराशिव ग्रामीण – ०८/०५/२०२६
धाराशिव शहर – १५/०५/२०२६
शिबिरांत उपलब्ध सेवा
1.७/१२ नोंदी व मोहीम अंतर्गत ७/१२ वाचन व नोंदी तपासणी
2.सामाजिक व आर्थिक योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृती
3.विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक कागदपत्रांची नोंदणी
4.मंजूर फेरफार व खाते उतारा/नोंदी उपलब्ध करणे
भूमी व तुकड्याबंदी संदर्भातील शासकीय मार्गदर्शन
5.अकुशल तारणगी सुधारणा संदर्भातील मार्गदर्शन.
या शिबिराद्वारे नागरिकांना प्रशासनाची प्रत्यक्ष मदत मिळणार आहे, तसेच गावस्तरावरून समस्यांचे त्वरित निराकरण होईल, ज्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केले आहे

Post a Comment
0 Comments