तेरणा काठ वृत्तसेवा --- कळंब शहरातील कसबा पेठेतील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन शुक्रवार (ता.२७) साजरा करण्यात आला .
या दिनानिमित्त एक दिवसाचे मुख्याध्यापक म्हणून श्रावणी माने, उपमुख्याध्यापक आर्या शिनगारे, पर्यवेक्षक समृद्धी गीते या विद्यार्थ्यांनी काम पाहिले. व उर्वरित विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम पाहिले सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
स्वयंशासन दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला आठवण म्हणून साऊंड बॉक्स भेट दिला. सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या आलेल्या अध्यापनाचा अनुभव व शाळेचा अनुभव आपल्या मनोगता मधून व्यक्त केला. शाळेचे मुख्याध्यापक . खरडकर, .गीते सर आदींनी या विद्यार्थ्यांच्या कामकाजावर लक्ष साधले.
-------------------------------------

Post a Comment
0 Comments