Type Here to Get Search Results !

येरमाळा येथील विद्यानिकेतन विद्यालयाचा कला उत्सव उत्साहात साजरा



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा येथील विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे संचालक सचिन पाटील व संचालिका स्वाती पाटील यांच्या पुढाकारातून विद्यानिकेतन विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यानिकेतन कला उत्सव उत्साहात पार पडला.

    दोन दिवसीय चाललेल्या विद्यानिकेतन कला उत्सवाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक ) दिनकरराजे होळकर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक भारत देवगुडे यांनी केले तर दुसऱ्या दिवशी जिल्हा कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे, जवाहर नवोदय विद्यालय बीडचे प्राचार्य विजयकुमार बोस यांनी केले यावेळी विद्यालयाचे संचालक सचिन पाटील, संचालिका स्वाती पाटील,

विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बांगर, प्रियंका काकडे, येरमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल सचिव दत्ता बारकुल, सुधीर लोमटे, बालाजी रमेश बारकुल, येरमाळा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी बारकुल, सतीश पाटील यांच्यासह आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती.



रंगमंचावर लहान मुले, विद्यार्थ्यी व विद्यार्थिनींनी एकाहून एक सरस गाण्यांच्या तालावर नृत्याविष्कार सादर करीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गोंधळ, येडाईची गाणी,भारूड, लावणी, पोवाडा, गवळण, दैवत छत्रपती,,शिवबा आमचा मल्हारी, फॅन्सी डान्स,शिव तांडव, वाघ्या मुरळी, पाळणा, देशभक्तिपर गीत, शेतकरी गीत आदी विविध सादरीकरणांनी कार्यक्रम रंगवला 

कार्यक्रम निर्मिती, नृत्यदिग्दर्शन व ड्रेस डिझाईनिंग अंजली घोटाळे, दिपाली शिंदे, रोहिणी शिंदे, फिजा पठाण ,ज्योत्स्ना बावकर, उषा बारकुल , अशोक गपाट विजय ओव्हाळ योगेश कापसे, रेश्मा गायकवाड, ओमकार खामकर,संजय कोरे, पांचाळ सर, दिवाने सर यांनी केले.मुख्याध्यापक संजय बांगर व अनिल डोके सर यांनी मार्गदर्शन केले. रंगमंच व्यवस्था नितीन पाटील, महेश जाधव, गणेश मुळे, गणेश दिवाने, अमोल भातलवंडे ,सोनू दिवाने यांनी केली.  विद्यालयाचे संचालक सचिन पाटील यांनी प्रास्ताविक केले तर सुशेन जाधवर, अंजली घोटाळे व जडे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले शेवटी उपस्थितांचे आभार स्वाती पाटील मॅडम यांनी मानले 


Post a Comment

0 Comments