Type Here to Get Search Results !

महात्मा बसवेश्वर विशेष सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा --- श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरूम या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. १९) रोजी बसव भवन  सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे होते. यावेळी प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किरण सगर, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, डॉ. महेश मोटे, संस्थेचे सचिव कमलाकर जाधव, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, संचालक मनिष मुदकण्णा अमृत वरनाळे, विजय काशेट्टी, श्रीशैल बिराजदार, शिवराज समन, बाबासाहेब पाटील, वंदना सोनवणे, इंद्रजित लोखंडे, संंगिता जाधव आदी संचालकाची 


प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे शिवशरण वरनाळे यांनी चालु वर्षाचा आर्थिक उलाढालीचे वाचन करून सन २०२४–२५ या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडून पतसंस्था उल्लेखनीय प्रगती करुन ठेवी व कर्जवाटप व भागभांडवलामध्ये व इतर व्यवहारात  अपेक्षित वाढ होत असल्याची माहिती त्यांनी सभासदांना दिली. संस्थेचे आजचे भागभांडवल १ कोटी ५० लाख, ठेवी १५ कोटी ८९ लाख, कर्ज वाटप  १३ कोटी ६० लाख, गुंतवणूक ५ कोटी ४० लाख, गतवर्षी नफा २९ लाख ५० हजार इतका झाल्याचे सभासदांना संभोदित करताना सांगितले. संंस्थेचे सचिव कमलाकर जाधव यानी विशेष सर्वसाधारण सभेत अधिकृत भागभांडवल १५ कोटी, सभासदांच्या एका भागाची दर्शनी किंमत १०० रुपये असून आता ते ५०० रुपये राहील.  संस्थेच्या कर्मचाऱी वर्गांसाठीचे सेवा नियम वाचून  दाखविले. सर्वाच्या संमतीने टाळ्याच्या गजरात ठराव पास करण्यात आला व तो एकमताने मंजूर करण्यात आला. सभासदांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. 

अध्यक्षांनी आपल्या भाषणात संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. भविष्यात अधिकाधिक सभासदांना कर्जसुविधा व आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. शिवजयंती निमित्त प्रा. किरण सगर, प्रा. दता इंगळे, प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मनोगते व्यक्त केली. सभेचे सूत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार मनीष मुदकण्णा यांनी मानले. सभेला मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.                                   


Post a Comment

0 Comments