Type Here to Get Search Results !

नूतन शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांचा सत्कार



तेरणा काठ वृत्तसेवा --- धाराशिव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर नुकतेच रुजू झालेले रवींद्र खंदारे यांचा सत्कार वेतन  पथकाच्या वतीने करण्यात आला आहे. 

धारशिव येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदावर रवींद्र  खंदारे यांची नियुक्ती झाली असल्याने वेतन पथक (प्राथमिक) धाराशिव यांच्या वतीने नवनिर्वाचित अधिकारी यांचा सत्कार सोमवार (ता.१६) करण्यात आला आहे. यापूर्वी या शिक्षणाधिकारी पदावर नागेश मापारी हे होते, त्यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांच्या जागी रवींद्र खंदारे आले आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी त्यांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी धाराशिव येथील कार्यालयात ते दाखल झालेले आहेत. यावेळी वेतन पथक प्राथमिक अधीक्षक दिनकर  होळकर, उपशिक्षणाधिकारी कैलास पिकवणे, दत्तप्रसाद जंगम , शिवराज गोरे, श्रीमती घाडगे ,  राजाभाऊ गायकवाड आदींनी नवनिर्वाचित प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांचा  शाल श्रीफळ देऊन. यथोचित सत्कार केला.


Post a Comment

0 Comments