Type Here to Get Search Results !

येरमाळा को ऑफ डेअरी सोसायटीच्या दूध संकलन केंद्रात दिवाळी शिधा वाटप



तेरणा काठ वृत्तसेवा --- येरमाळा को ऑफ सोसायटी संघाच्या दूध संकलन केंद्र दिवाळी निमित्त गाई पालन शेतकऱ्यांना  शिधा वाटप करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षापासून येरमाळा को-ऑपरेटिव्ह डेअरी सोसायटीच्या वतीने दूध संकलन करण्यात येते. गावातील अनेक शेतकरी या दूध संकलन केंद्रास जोडले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सणानिमित्त सुखसोयीच्या सुविधा दिल्या जातात. दूध उत्पादकाच्या हिताचे निर्णय सदैव दूध संकलन केंद्र घेत असल्याने या दूध संकलन केंद्रात दूध उत्पादक वर्ग मोठ्या प्रमाणात आपले दूध वितरित करतो त्यामुळे या संक्रांत केंद्रात दूध मोठ्या प्रमाणात संकलित होते. सालाबादप्रमाणे याही वर्षी दिवाळीनिमित्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना शिधावाटप करण्यात आले यावेळी डेअरीचे चेअरमन प्रा. अंकुश पाटील सचिव पंढरी नाना बारकुल, व्यवस्थापक सचिन घेवारे दूध उत्पादक शेतकरी संतोष कोकाटे, अशोक नवले यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments