Type Here to Get Search Results !

२८ जुलै रोजी होणाऱ्या संविधान बचाव मोर्चासाठी विविध समित्या गठित



तेरणा काठ वृत्तसेवा : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात २८ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य संविधान बचाव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, धाराशिव यांच्या वतीने तालुका समिती व विविध नियोजन समित्यांची घोषणा करण्यात आली.

मोर्चा शिस्तबद्ध, प्रभावी व यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्ते, सामाजिक संघटना व विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

तालुका समिती सदस्य: भाई फुलचंद गायकवाड, पुष्पराज माळाळे, राजाभाऊ राऊत, सुनील वाघमारे, बालाजी माने, अप्पासाहेब घावारे, विशाल शिंगाडे, संपत्त जानराव, भालचंद्र कटारे, धनंजय वाघमारे, यशपाल गायकवाड, संतोष खुने, आप्पा कांबळे, संतराम अंकुश, मारुती अंकुश, सुमेध वाघमारे, समाधान सरवदे, संपत सरवदे, तुकाराम गवळी, उमेश शिंदे, पंकज शिंदे, तानाजी शिंदे, आप्पा मस्के, प्रमोद राऊत, सोमनाथ गायकवाड आदींचा समावेश आहे.

विविध समित्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत :

स्टेज समिती : पुष्पराज माळाळे

पोस्टर, बॅनर व निवेदन समिती : राजाभाऊ ओव्हाळ, धनंजय शिंगाडे, कैलास शिंदे, अनिल हजारे, संजय बनसोडे (निवेदन तयार करणे)

पाणी व्यवस्थापन समिती : विशाल शिंगाडे

वाहतूक (गाड्यांचे नियोजन) समिती : बाळासाहेब माने

झेंडा, टोपी व बॅच समिती : कुंदन वाघमारे

संरक्षक समिती : समता सैनिक दल, विकास बनसोडे, धनंजय वाघमारे

महिला समिती : राज्यश्री कदम, विजयामाला धावारे

प्रसिद्धी प्रमुख : मल्लिकार्जुन सोनवणे, शितल शिंदे, सचिन वाघमारे, कुंदन शिंदे, किरण कांबळे, शिवाशंकर वाघमारे, विजय बनसोडे

इतर सहकार्य : अनुसूचित महिला बचत गटाच्या महिला, वकील संघटना व ॲड. अनिरुद्ध नागटिळक.

कृती समितीने जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी, सामाजिक, पुरोगामी संघटना, विद्यार्थी, महिला, युवक आणि नागरिकांना २८ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या संविधान बचाव मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

समितीच्या वतीने सांगण्यात आले की, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून संविधानाने दिलेल्या हक्कांवर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments